News Information Entertainment

Search
Close this search box.

मराठी चित्रपट ‘शिनवार’ आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पुणे: मराठी चित्रपटसृष्टीत आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट प्रदर्शित झाला आहे. ‘शिणवार’, हा वास्तववादी आणि उत्कंठावर्धक चित्रपट, आजपासून महाराष्ट्रभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

‘परी प्रोडक्शन’च्या बॅनरखाली तयार झालेला हा चित्रपट विलास शिंदे यांच्या निर्मितीत साकारला आहे. दिग्दर्शक बाबासाहेब लाटे यांच्या कुशल दिग्दर्शनाखाली चित्रपटाला खास आयाम मिळाला आहे. यामध्ये छायाचित्रणाची जबाबदारी नवनाथ पांढरे यांनी समर्थपणे पार पाडली असून, संगीताचा साज संतोष भालेराव यांनी चढवला आहे.

चित्रपटात प्रमुख भूमिकांमध्ये परी पटेल आणि राहुल शिंदे यांचा दमदार अभिनय पाहायला मिळतो. शुभांगी देवकुळे यांची सहाय्यक भूमिका प्रेक्षकांना भावेल, तर प्रमुख खलनायकाच्या भूमिकेत विलास शिंदे यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.

‘शिणवार’ची कथा थरारक, सामाजिक संदर्भाने परिपूर्ण आणि विचारप्रवृत्त करणारी आहे,

‘शिणवार’ हा चित्रपट तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात अनुभवायला विसरू नका! मराठी चित्रपटसृष्टीला प्रोत्साहन द्या आणि या उत्कंठावर्धक चित्रपटाचा आनंद लुटा.

स्रोत: www.aphtimes.in

APH Times
Author: APH Times

Leave a Comment

अधिक वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool